Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

पुण्यातील एफसी रोड, जेएम रोडवरील ४० फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील एफसी रोड, जेएम रोडवरील ४० फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल

डेक्कन पोलिसांनी केले गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील नामांकित फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफसी रोड) आणि जंगली महाराज रोड (जे.एम रोड) डेक्कन जिमखाना परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. पदपथावर गॅस शेगडी वापरून अन्नपदार्थ विकणार्‍या ४० फेरीवाल्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित परिसर नेहमीच विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांच्या वर्दळीचा आहे.

कोयते उगारून दहशत माजविणारे टोळके गजाआड – सविस्तर बातमी 

रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने विक्रेते वडा पाव, अंडी भुर्जी आणि चायनीज पदार्थांची व्रिकी करतात. अनेक विक्रेते कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन न करता उघड्यावर गॅस सिलिंडर आणि शेगडी वापरत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या .गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे गॅस सिलिंडर वापरल्याने अपघात होऊ शकतात. गॅस गळती किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्यास मोठी आपत्ती घडू शकते. म्हणूनच पोलिसांनी कडक कारवाई केली. पदपथावर चालणार्‍या पादचार्‍यांच्या अगदी जवळ गॅस शेगडी पेटवल्या जात होत्या. त्यामुळे पादचार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपाययोजनांशिवाय सार्वजनिक ठिकाणी असे व्यवसाय चालवणे बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डेक्कन पोलिसांनी रस्त्यावरील ४० विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांनी दिली आहे. ही मोहीम पदपथावर अतिक्रमण करणार्‍या आणि धोकादायक पद्धतीने अन्न विकणार्‍यांविरूद्ध राबविण्यात येत असून, भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×