खडक पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – Budhwar Peth News : शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात बेकायदेशीररित्या राहणार्या ६ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिसांनी २७ ऑक्टोबर मध्यरात्री परिसरात छापा टाकला. कारवाईत बांगलादेशी महिला आढळून आल्या असून, त्यांच्याशी संबंधित एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील बुधवार पेठेत ६ बांगलादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी
बेकायदेशीर वास्तव्य करणार्या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागासह ठिकठिकाणी पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ एकच्या हद्दीत खडक पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत ६ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे वास्तव्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच संबंधित महिलांना बांग्लादेशात पाठवले जाणार आहे. ही कामगिरी उपायुक्त कृषीकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, एपीआय अनिल सुरवसे एपीआय कुडले, उपनिरीक्षक कांबळे उपनिरीक्षक मखारे, उपनिरीक्षक गाडीलवाड यांच्या पथकाने केली.
बांग्लादेशी महिलांशी संबंधित असलेल्या एजंटला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या एजंटसह आणखी दोन फरार आरोपींविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला. कारवाईमुळे बुधवार पेठ परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.























