दाम्पत्य अटकेत; चार तरुणी ताब्यात
marathinews24.com
पुणे – Pune Crime News: आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली देहविक्रयाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. या प्रकरणी चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. महादेवी विकास चौगुले (वय ४२), विकास शंकर चौगुले (वय ५०, रा. अवनिश रिजन्सी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार स्वप्नील सूर्यवंशी यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ डाॅक्टरांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेत आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची माहिती नऱ्हे पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला. (Pune Crime News) बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी खातरजमा केली. पोलिसांनी सदनिकेत छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्या प्रकरणी चौगुले दाम्पत्याला अटक करण्यात आली.























