Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात सराफाची दीड कोटींची फसवणूक

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांचे शुद्ध सोने घेऊन अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,योगेश उमेश संचेती, मंगला उमेश संचेती, उमेश तिलोकचंद संचेती (तिघे रा.आदर्शनगर, पुणे-सातारा रस्ता) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा नदीपात्रात उडी मारुन तरुणीची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाची सोन्या मारुती चौक परिसरात पेढी आहे. आरोपींची त्यांची गेल्या वीस वर्षंपासून ओळख आहे. आरोपींची सराफी पेढी आहे. व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून सराफ व्यावसायिकाकडून आरोपींनी वेळोवेळी दीड किलो शुद्ध सोने घेतले. त्यापैकी ५०० ग्रॅम सोने परत केले. मात्र, उर्वरित एक किलो शुद्ध सोने परत केले नाही. सराफ व्यावसायिकाने त्यांच्याकडे सोने परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर सव्फ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पाेलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

मोटारीची काच फोडून रोकड चोरी

पुणे- मोटारीची काच फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र किसन शिंदे (वय ४३, रा. पांढरवाडी, ता. पाटण, जि. सातारा) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कामानिमित्त हडपसर परिसरात आले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात बुधवारी (६ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी मोटार लावली. मोटार लावून ते एका उपाहारगृहात चहा पिण्यासाठी गेले. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून २९ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. उपाहारगृहातून बाहेर पडल्यानंतर रोकड चोरीची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×