पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी, ३९ लाखांचे दागिने लंपास

हडपसरमधील सराफी पेढीतून ९८ लाखाांचे दागिने चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३९ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. याबाबत एकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर परिसरात तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. एनडीए-वारजे रस्त्यावरील शिवणे भागात असलेल्या लक्ष्मी शांतीबन सोसायटीत ते राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ३९ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी घटनास्थळ भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट तपास करत आहेत.

नवी पेठेत घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील नवले पथ परिसरात तक्रारादाराचे बैठे घर आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.

वाघोलीत १२ लाखांचा ऐवज चोरी

वाघोली भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १२ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाघोलीतील स्टार सिटी सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×