वाघोलीजवळील बकोरी गावात घरफोडी

बालेवाडी, मुंढव्यातून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

१२ लाखांचे दागिने चोरीला

marathinews24.com

पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १२ लाख ३२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १९ डिसेंबरला सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सहाच्या सुमारास बकोरी गावातील स्टार सिटी वारगडे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी, ३९ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बकोरी गावातील स्टारसिटी वारगडे वस्तीवर राहायला आहे. १९ डिसेंबरला सकाळच्या सुमारास त्या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून लॉकरमधील १२ लाख ३२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तक्रारदार महिला घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×