कोरेगांव पार्कमध्ये घरफोडी; १४ लाखांचा ऐवज चोरला

कोरेगांव पार्कमध्ये घरफोडी; १४ लाखांचा ऐवज चोरला

कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

maratinews24.com

पुणे – शहरातील कोरेगांव पार्कमधील नॉर्थमेन रोडवरील फ्लॅटमधून चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १३ लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. बुधवारी (दि. ४ ) मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार १ ते २ फेब्रुवारीदरम्यान घडला आहे.

पुणेकरांवर शेअर मार्केटचे जाळे; कोट्यवधींची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगांव पार्क येथील नॉर्थमेन रोडवरील कमलकुंज ही बहुमजली सोसायटी आहे. हा परिसर हायप्रोफाईल म्हणून ओळखला जातो. मध्यरात्री तक्रारदार यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घुसून त्यांच्या बेडरूममधील कपाटातील पावणे तीन लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा १३ लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करून चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×