सायबर गुन्ह्यांचे सत्र कायम
marathinews24.com
पुणे – शेअर मार्केटच्या माध्यमातून वेगवेगळ्या बहाण्याने पुणेकरांची कोट्यवधींची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. तीन घटनांमध्ये जवळपास १ कोटी ९ लाख रुपये फसवूणक केल्याची घटना घडली आहे.
पूर्वसूचना न देता झोपड्या तोडल्याने झोपडपट्टी सुरक्षा दलाचा संतप्त मोर्चा – सविस्तर बातमी
मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार मोबाईल धारक व लिंक धारक यांच्यावर आयटी अक्टसह फसवणूकीचा गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार व्यावसायिक असून बिबवेवाडीत राहण्यास आहेत. त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून तब्बल ४२ लाख ६६ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर त्यावर परतावा न देता त्यांची फसवणूक केली. अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक सुनिता नवले या करत आहेत.
दुसऱ्या घटनेत वाघोली येथील व्यक्तीला २६ लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी केसनंद येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिल आहे. चोरट्यांनी तरुणाला शेअर मार्केटचे फ्री क्लासेस चालविले जातात व परतावा मिळवून देण्यासाठी फ्री क्लास जाईन करा, अशी एक फेसबुकची लिंक पाठवून माहिती दिली. त्यांना लिंकद्वारेच एका ग्रुपमध्येही ऍड केले. नंतर ट्रेटिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याची फसवणूक केली. याप्रकरणी वाघोली पोलिसांत सायबर चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे करत आहेत.
स्टॉक खरेदी व त्यावर जास्त परतावा देण्याच्या आमिषाने ५९ वर्षीय व्यक्तीची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार यांना अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यावर स्टॉक खरेदी व त्यावर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले गेले होते. अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक देवकाते या करत आहेत.
























