३ लाखांचा ऐवज लंपास
marathinews24.com
पुणे – लोणी काळभोर भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय लोणी काळभोरमधील बाजारमळा परिसरात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.





















