चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, पाषाण परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात टोळीयुद्धातून खूनातील चौघे आरोपी ताब्यात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय सुतारवाडी परिसरातील एका सदनिकेत राहायला आहेत. २७ ऑक्टोबर रोजी तरुण आणि त्याचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यानी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून एक लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण सहा लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.
हाॅटेल कामगारांने रोकड चोरली
हाॅटेल कामगाराने गल्ल्यातील ३५ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, लॅपटॉप असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत एका हाॅटेल चालकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे लोहगावातील निंबाळकर गर परिसरात हॉटेल आहे. त्याठिकाणी तीन कामगार काम करत होते. कामगार हाॅटेलमध्ये झोपायचे. कामगारांनी चोरी केल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत.



















