Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यातील वाघोली, बिबवेवाडीत घरफोडी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

१५ लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे– शहरातील वाघोली, बिबवेवाडी भागात घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी १५ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वाघोली आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी, वडगाव शेरीत महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीतील सिद्धार्थनगर भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय मंगळवारी (३० सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील ३५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा नऊ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. दीड तासानंतर तक्रारादार घरी परतले. तेव्हा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

बिबवेवाडी भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील दहा हजारांची रोकड आणि दागिने असा सहा लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तपास करत आहेत. शहरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा सोसायटीत शिरुन चोरटे घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×