Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

विश्रामबाग परिसरात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला

वेगवेगळ्या घटनेत १९ लाखांचा ऐवज चोरी

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून १९ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विश्रामबाग, बंडगार्डन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकवासला धरणाजवळ रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० लाख ९८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत नेहा श्रीराम वाघ (रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, वाघ यांची आई चारधाम यात्रेला गेल्या आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून १० लाख ९८ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

पुणे स्टेशन भागातील आगरकरनगर परिसरातील फ्लॅटमध्ये राकेशकुमार भगवती प्रसाद (वय ३७) हे खासगी रेल्वे आरक्षण केंद्र चालवितात. चोरट्यांनी त्या फ्लॅटचे कुलूप तोडून ६८ हजार रुपयांचा लॅपटाॅप आणि रोकड चोरुन नेली. याबाबत प्रसाद यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाख ३९ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत बिपीन अजयराव घाडगे (वय ४५, रा. आशिष अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर तपास करत आहेत. चोरटे सोसायटीतील बंद फ्लॅटची पाहणी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, अशा सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेत आहेत. दरम्यान, सुटी निमित्ताने गावी गेलेल्या नागरिकांमुळे चोरट्यांचे फावले असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×