Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात बस चालकाचा जीव वाचविला, पोलिस आयुक्तांनी अंमलदारांचा केला सत्कार

पुण्यात बस चालकाचा जीव वाचविला, पोलिस आयुक्तांनी अंमलदारांचा केला सत्कार

बस चालकाला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ केली होती मदत 

marathinews24.com

पुणे – हृदयविकाराचा झटका आलेल्या पीएमपील बस चालकाचा प्राण वाचविणारे पोलिस अमंलार रोमेश ढावरे आणि महिला पोलिस अमंलदार अर्चना निमगिरे यांचा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सत्कार केला आहे. बेलबाग चौकामध्ये दि. २५ ऑगस्टला पोलिस शिपाई ढावरे व पोलिस शिपाई निमगिरे हे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लक्ष्मी रोडवर वाहतुक नियमन करत होते.

रोख बक्षिस हे खेळाडूंच्‍या कष्टाला दिलेली दाद- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

पीएमपील बस सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी रोडवरून पुणे स्टेशन ते कुबेर पार्क सिटीपोस्ट ऑफिसजवळ आली. त्यावेळी बस चालकाला हृदय विकाराचा झटका आला. बस चालक लक्ष्मण अंबुरे ( वय ४१, रा. वारजे माळवाडी) यांना ह्दय विकाराचा झटका बसल्याने प्रवासी भयभीत झाले. यावेळी प्रवाशी मदत मिळण्यासाठी आवाज देत होते. त्यावेळी अमंलदार रोमेश ढावरे व अर्चना निमगिरे यांनी बसमधील प्रवाशांचा आवाज ऐकून बसकडे धाव घेतली. त्यांनी बसमधून चालकाला बाहेर काढून त्याला फुटपाथवर झोपवले. त्यावेळेस बसचालक बेशुध्द अवस्थेत होते. परिस्थितीत दोन्ही अमंलदारांनी प्रसंगावधान राखत तात्काह सीपीआर दिला. त्यामुळे थोड्याच वेळात चालकाला शुध्द आली. बसचालक शुध्दीवर आल्यावर त्यांना तात्काळ अ‍ॅम्बुलन्सची वाट न पाहता रिक्षा चालक राजेश आरकल यांच्या मदतीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. समय सुचकतेमुळे बस चालकाचे प्राण वाचले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×