Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

‘आयसीएआय’च्या अध्यक्षपदी सीए प्रसन्न कुमार; तर उपाध्यक्षपदी सीए मंगेश किनारे यांची निवड

'आयसीएआय'च्या अध्यक्षपदी सीए प्रसन्न कुमार; तर उपाध्यक्षपदी सीए मंगेश किनारे यांची निवड

आयसीएआय २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड

marathinews24.com

पुणे – दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच नवी दिल्ली येथे झाली असून, अध्यक्षपदी सीए प्रसन्न कुमार डी. तर उपाध्यक्षपदी सीए मंगेश पांडुरंग किनारे यांची निवड करण्यात आली आहे.

जैन दीक्षा म्हणजे धैर्याचा शिखरबिंदू; संसारत्याग मोठी साधना- मंगलप्रभात लोढा – सविस्तर बातमी 

सीए प्रसन्न कुमार डी. हे ‘आयसीएआय’चे ७४ वे अध्यक्ष बनले असून, १९८४ पासून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. चार दशकांहून अधिक अनुभव असलेल्या कुमार यांनी संस्थेच्या विविध समित्यांचे नेतृत्व केले आहे. शासन व नियामक संस्थांशी संबंधित धोरणात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. उपाध्यक्ष म्हणून २०२५-२६ मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट्स बेनेव्होलंट फंडसाठी उल्लेखनीय निधी उभारणी केली होती.

सीए मंगेश किनारे हे ‘आयसीएआय’च्या केंद्रीय परिषदेवर तिसऱ्या कार्यकाळासाठी कार्यरत असून लेखा, लेखापरीक्षण, कर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्षेत्रात ३३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते व्यावसायिक विकास समितीचे माजी अध्यक्ष असून जीएसटी व आचारसंहितेवरील तज्ज्ञ वक्ते म्हणून ओळखले जातात.

नव्या नेतृत्वाकडून व्यावसायिक दर्जा उंचावणे, सदस्य कल्याण व जागतिक स्तरावर संस्थेची उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×