Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

रिंगरोडसाठी ३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण

रिंगरोडसाठी ३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण

भूसंपादनाच्‍या कामाला मिळणार गती

marathinews24.com

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या (पीएमआरडीए) वतीने होणाऱ्या रिंगरोडच्‍या भूसंपादन कामाला गती मिळणार आहे. पीएमआरडीएच्‍या हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोडसाठी आवश्‍यक असलेल्‍या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. भूमी अभिलेख आणि उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय हवेली यांच्‍याकडून ३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी केली आहे. मोजणीबाबतचे विवरणपत्र जिल्‍हाधिकारी पुणे यांच्‍याकडे पाठविले आहे. भूसंपादनासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी आणखी सुलभता येणार आहे.

पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा – सविस्तर बातमी 

पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणारा रिंगरोड हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आणि इतर शहरांमधून पुण्यात येणारी अवजड वाहतूक वळविण्याच्या दृष्टीकोनातून या रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. रिंगरोड सोळू ते परंदवाडी या अंतरात केला जाणार आहे. एकूण ८२.३८ किलोमीटर अंतरात ६५ मीटर रुंदीचा हा रस्ता असणार आहे. रिंगरोड सुरुवातीला ११० मीटर रुंदीचा करण्यात येणार होता.

मात्र, नागरिकांचा विरोध झाल्याने त्याची रुंदी ६५ मीटर निश्चित करण्यात आली आहे. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे या सुमारे ५.४० किलोमीटर अंतरात काम केले जाणार आहे. खेड तालुक्‍यातील सोळू, वडगाव शिंदे आणि निरगुडी येथील जमिनीची मोजणी २०२४ मध्ये पुर्ण करण्यात आली आहे. तीनही ठिकाणची मिळून २८.२ हेक्‍टर गटाच्‍या क्षेत्राची मोजणी पुर्ण करण्यात आली आहे.

पहिल्‍या टप्‍प्‍यातील मोजणी पूर्ण झाल्‍यानंतर दुसऱ्या टप्‍प्‍यातील मोजणीची कार्यवाही पीएमआरडीएच्‍या भूमी अभिलेख आणि उपधिक्षक भूमी अभिलेख हवेली विभागाकडून समन्वयाने सुरू करण्यात आली. हवेली तालुक्‍यातील आंबेगाव खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी आदी गावातील एकूण गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पुर्ण करण्यात आली. या सर्व गावांमधून एकूण ३९.१९ हेक्‍टर गटांची मोजणी मार्च २०२५ मध्ये पुर्ण झाली आहे.

त्‍याचा अहवालही पीएमआरडीएच्‍या भूमी अभिलेख विभागाने जिल्‍हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनासाठी पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

हवेली तालुक्‍यातील गावांमधील झालेली मोजणी (हेक्‍टरमध्ये) 

आंबेगाव खुर्द – १०.८२

भिलारेवाडी – १.६३

मांगडेवाडी – १५.९४

निंबाळकरवाडी – ३.७०

पिसोळी – ५.४६

वडाचीवाडी १.६४

खेड तालुक्‍यात २०२४ मध्ये पूर्ण झालेली मोजणी 

सोळू – १३.१७

वडगाव शिंदे – ५.७१

निरगुडी – ९.३२

यासंदर्भात पीएमआरडीएच्या भूमी अभिलेख अधीक्षक आशा जाधव म्हणाल्या, रिंगरोडसाठी जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत भूसंपादन करण्यात येणार आहे. त्‍यासाठी हवेली तालुक्‍यातील काही गावातील गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पुर्ण केली आहे. मोजणीचे विवरणपत्र आपण जिल्‍हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. त्‍यांच्‍या मार्फत पुढील कार्यवाही केली जाईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×