विभागीय स्तरावर क्रीडा निपुणता केंद्रात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय स्तरावर क्रीडा निपुणता केंद्रात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्यातील क्रीडा विकासाकरिता ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पुणे विभागीय स्तरावर ॲथलेटिक्स, वेटलिफ्टींग, शुटींग, रोईंग, लॉन टेनिस, कुस्ती, टेबल टेनिस व हॉकी या आठ खेळांची नऊ क्रीडा निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असून प्रवेशासाठी प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

गुरु तेग बहादुर : भारताच्या धर्मस्वातंत्र्य परंपरेचे प्रतीक – सविस्तर बातमी 

ॲथलेटिक्स, शुटींग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस या पाच खेळांसाठी प्रत्येकी २० खेळाडूंची व हॉकीसाठी ४० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यासाठी २५ वर्षाआतील मुले, मुली पात्र असतील. प्रवेशासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गेल्या २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज ३ छायाचित्र, शाळा- महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील. खेळाडू क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांचे वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य राहील.

निवड झालेल्या खेळाडूंना निवास, भोजन, पूरक आहार खर्च, क्रीडा साहित्य, प्रशिक्षण साहित्य, खेळाडूंचे किट, निवडलेल्या खेळाडूंचे देशांतर्गत, परदेशी प्रशिक्षणासाठी होणारा खर्च, स्पर्धा सहभाग खर्च, खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या, किरकोळ वैद्यकीय उपचाराचा खर्च क्रीडा व युवक सेवा विभागामार्फत करण्यात येईल.

इच्छुाक व पात्र खेळाडूंनी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे नं. १९१, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे विद्यालयासमोर, येरवडा, पुणे- ४११००६ येथे प्रत्यक्ष अथवा deputypune@gmail.com या ईमेलवर विहित मुदतीत अर्ज करावेत. जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही नाईक यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×