पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानांचे आयोजन
marathinews24.com
पुणे – पहेलगाम, जम्मू-काश्मिर येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षितेतच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना देशाच्या प्रती जाणीव व्हावी, यासाठी प्रत्येक शनिवारी व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन – सविस्तर बातमी
तरी याअनुषंगाने स्वेच्छेने व्याख्यान देण्यास इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव कल्याण संघटक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे कळवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स. दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.