Breking News
फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने तरुणाची ४७ लाखांची फसवणूकराँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हेसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभडेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटकबालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणारशासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूकपुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटलीअल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटनावाहतूक नियमन करा, कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवाहिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन

marathinews24.com

पुणे – जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने **२१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत हा उपक्रम होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत – सविस्तर बातमी 

जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्येची वाढ आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे संवर्धन, पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. यासाठी नागरिकांमध्ये जलसाक्षरता आणि जलसंवर्धनाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.

याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’मध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी स्वतः सहभागी होणार आहेत. “जलसंधारणाची मोहीम लोकचळवळ म्हणून निर्माण व्हावी, यासाठी मी या अभियानामध्ये सहभागी होत आहे. तुम्हीही सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

“माती वाचवा, पाणी वाचवा आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा,” हा संदेश घेऊन नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. विशेषतः युवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, विविध शासकीय विभाग, उद्योजक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

पावसाचे प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत मुरवणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र अधिक जलसमृद्ध करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे उपस्थित राहून ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×