Breking News
सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कररुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (वय ५१, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढा काॅलनी, सदाशिव पेठ) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठ, येरवडा भागात वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करुन आक्षेपार्ह वक्तव्य केले. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करण्यात आली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. सपकाळ यांचे वक्तव्य तेढ निर्माण करणारे आहे, असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

घाटे यांनी शनिवारी सायंकाळी याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरुन पोलिसांनी रात्री उशीरा पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे तपास करत आहेत. दरम्यान, सपकाळ यांनी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले. पुण्यात पतित पावन संघटनेकडून काँग्रेस भवनसमोर रविवारी सकाळी आंदोलन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×