Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठ, येरवडा भागात वाहतूक बदल

महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठ, येरवडा भागात वाहतूक बदल

सकाळी सहा ते रात्री उशिरा गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक बदल

marathinews24.com

पुणे – महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेतील श्री पुण्येश्वर मंदिर, तसेच येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिर परिसरात रविवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.‘कसबा पेठेतील श्री पुण्येश्वर मंदिर, तसेच येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते. त्यापार्श्वभूमीवर रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी सहा ते रात्री उशिरा गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

पुण्यात ५ हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई – सविस्तर बातमी 

कसबा पेठेतील अगरवाल तालीम रस्ता, तसेच पवळे चौक ते श्री पुण्येश्वर मंदिर दरम्यान असलेल्या रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात अले असून, या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेे’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

कसबा पेठेतील कुंभारवेस चौकातून फडके हौदाकडे जाणाऱ्या वाहनांनी कुंभारवेस चौक, गाडगीळ पुतळा, जिजामाता चौक, लाल महाल, गणेश रस्ता, फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जावे. सूर्या हाॅस्पिटल चौकातून अगरवाल तालीम रस्त्याने पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी जिजामाता चौक, गणेश रस्ता, फडके हौद चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिर चौकातून नगर रस्त्यावरील गुंजन चित्रपटगृहाकडे जाणारी वाहतूक आवश्यकेनुसार वळविण्यात येणार आहे. तारकेश्वर चौकातून नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सादलबाबा दर्गा चौकातून उजवीकडे डाॅ. बाबासाहेब आंंबेडकर चौकाकडे वळविण्या्त येणार आहे. तेथून वाहन चालकांनी इच्छितस्थळी जावे. संगमवाडीतून तारकेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. भागातून जाणाऱ्या वाहनांनी डाॅ. आंबेडकर चौकातून इच्छितस्थळी जावे. चंद्रमा चौकातून तारकेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक डाॅ. आंबेडकर चौकातून वळविण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×