जागा हद्द निश्चितीसाठी ५० लाखांची लाच मागितली
Marathinews24.com
पुणे- भूमी अभिलेख विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले असून, जमिनीची हद्दनिश्चीत करण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून,याप्रकरणी संबंधिताने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुणे आर्थिंक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.
धूम स्टाईलने सोनसाखळी करणाऱ्यानां अटक – सविस्तर बातमी
अमरसिंह रामचंद्र पाटील, उपअधीक्षक भूमी अभिलेख, हवेली, पुणे आणि किरण येटोळे भूकरमापक, भूमी अभिलेख, हवेली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (वय ४१) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अष्टेकर यांची हडपसर परिसरात जागा असून, संबंधित जागेची मोजणी केली होती. मात्र, हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत २०२३ पासून सातत्याने भू अभिलेख विभागाकडे अर्ज केला होता. संबंधत अधिकार्यांकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती. यादरम्यान, भू-अभिलेख विभागातील अधिकारी अमरसिंह पाटील व किरण येटोळे यांनी जून २०२४ मध्ये संबंधित कामासाठी महिलेकडे ५० लाखांची मागणी केली. याप्रकरणी आरोपी येटोळे यांनी तक्रारदाराला सवलत देतो असे म्हणत २५ लाख रूपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास तर आरोपी उपअधीक्षक पाटील याने तक्रारदारला हेलीकॉप्टर शॉट लावतील, असे बोलून मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिली.
तक्रारदार अष्टेकर यांनी थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संबंधित अधिकार्यांविरूद्ध तक्रार केली. त्यानुसार याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली. तपासाअंती दोन्ही आरोपींनी तक्रारदार अष्टेकर यांचे नुकसान होण्यासाठी त्यांच्या जमीनी लगतधारकांची चुकीची क प्रत तयार करून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी चौकशीनुसार संबंधित अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.