Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

नायलॅान मांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

नायलॅान मांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

वारजे माळवाडी पोलिसांनी तरुणासह दोन अल्पवयीनांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घातक नायलाॅन मांजा बाळगल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी तरुणासह दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीनांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सुनील मुठे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी नदीत उडी मारून दरोडेखोरांना पकडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायलाॅन मांजाची विक्री, तसेच बाळगण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. नायलाॅन मांजामुळे गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. मांजामुळे चिरल्याने दुचाकीस्वार नागरिक, तसेच पादचारी जखमी झाल्याच्या घटना पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात घडल्या होत्या. मांजामुळे पक्ष्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. वारजे भागातील न्यू अहिरेगाव परिसरात एका तरुणासह दोन अल्पवयीन नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून नायलाॅन मांजाची रिळे जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×