हडपसरमध्ये वस्त्रदालनातून रोकड चोरीला

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर- सासवड रस्त्यावरील भेकराईनगर भागात वस्त्रदालनाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाहेरुन हॉटेल बंद करुन आतमध्ये हुक्का पार्लर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर तक्रारदार तरुणाचे वस्त्रदालन आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातून १७ हजार ६०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. दुकानाचा दरवाजा उचकटून रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत. शहरात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चंदननगर, हडपसर, मुंढवा, बाणेर भागात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×