फर्ग्युसन रस्त्यावर पुस्तक विक्री दुकानातून रोकड चोरीला

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती फर्ग्युसन रस्त्यावरील पुस्तक विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील १० हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘क्राॅसवर्ड’पुस्तक विक्री दुकानातील कर्मचारी उमाशंकर गुप्ता (वय ३७, रा. कळस, आळंदी रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्‍पवयीन गुन्‍हेगारी रोखण्यासाठी डिजीटल मोबाईल व्‍हॅन फिरणार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावर क्राॅसवर्ड बुक स्टोअर्स हे पुस्तक विक्री दुकान आहे. शुक्रवारी (५ डिसेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी पुस्तक विक्री दालनाचा दरवाजा उचकटून प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातून दहा हजार २४३ रुपये लांबविले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी पुस्तक विक्री दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×