अल्‍पवयीन गुन्‍हेगारी रोखण्यासाठी डिजीटल मोबाईल व्‍हॅन फिरणार

संवाद परिवर्तन यात्रेद्वारे जनजागृती

marathinews24.com

पुणे – शहरात गुन्‍हेगारी कारवायांमध्ये अल्‍पवयीन मुलांचा वाढता सहभाग पाहता पुणे पोलिसांनी यावर नियंत्रण आणण्यासाठी संवाद परिवर्तन यात्रेद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. डिजीटल मोबाईल व्हॅनद्वारे ही जनजागृती करण्यात येणार आहे. पुणे पोलिस झोन दोन आणि आदर्श मित्रमंडळ यांच्‍या संयुकत विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या डिजीटल वाहनाचे उदघाटन परिमंडळ दोनचे पोलिस पोलिस उपायुक्‍त मिलिंद मोहिते यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्‍यासह आदशृ मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

पुणे पोलिसांकडून तेजवानीच्या घरांची झाडाझडती – सविस्तर बातमी

मोबाईल व्हॅन जनजागृती (डिजीटल जनजागृती रथ) अभियानचा मुख्य हेतू समाजात बाल व युवा गुन्‍हेगारी विषयी जनजागृती निर्माण करणे. ज्‍या ठिकाणी गुन्‍हेगारीचे प्रमाण अधिक आहे त्‍या ठिकाणी त्‍या भागात पोहचणे, नागरिक, पालक व युवकांशी संवाद साधणे. गुन्‍हेगारीकडे झुकणाऱ्यां मुलांमध्ये परिवर्तन घडवून आणणे. नव्या संधी, समुपदेश, शिक्षण याद्वारे मुख्य प्रवाहात आणणे. हे डिजीटल वाहन परिमंडळ दोनमध्ये ७ पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत फिरणार आहे. यामध्ये चित्रफितीद्वारे ही जनजागती होणार आहे. तर प्रकाश वाटा गुन्‍हेगारी मुक्‍तीच्या या विषयावर आधिरी पथनाट्ये वेगवेगळ्या शाळामध्ये सादर करण्यात येणार आहे.

पथ नाट्यातून गुन्हेगारीचे दुष्परिणाम, संवादाचे महत्‍व, योग्य संगत, व्यसनांपासून दूर राहणे कायद्याचा आदर यावर प्रबोधात्‍मक संदेश देणे हा उद्देश असणार आहे. तर डिजीटल वाहनाच्‍या माध्यमातून गुन्‍हेगारी मुक्‍त समाजासाठी संवाद परिवर्तन यात्रा, स्‍टॉप क्राईम व पुणे वॉन्ट स्पिस अशा आशयाचे संदेश समाज मनात रूजवले जाणार आहे. पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्‍त रंजनकुमार शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जनजागृती मोहिमेचा उद्देश हा अल्‍पवयीन मुलांमध्ये, तरूणांमध्ये, पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आहे. गुन्‍हेगारीचे दुष्परिणाम, पालकांची जबाबदारी या चित्र रथाच्‍या माध्यमातून स्पष्ठ करण्यात येत आहे. – मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×