Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हांडेवाडीत मोटारीतून १६ लाखांची रोकड चोरीला

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी तब्बल १६ लाख ३२ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ४ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास हांडेवाडीतील भारत पेट्रोलपंपाजवळ घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव खुर्दमध्ये राहणार्‍या २९ वर्षीय तरूणाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअरमधील गुंतवणूकीचे आमिष अंगलट, ८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आंबेगाव खुर्दमध्ये राहायला असून, ४ मे रोजी तो मोटारीतून १६ लाख ३२ हजारांची रोकड घेउन हांडेवाडीत गेला होता. त्याने रस्त्याच्या कडेला अलिशान मोटार उभी केली होती. अज्ञात चोरट्याने गाडीचा दरवाजा उघडून रोकड चोरून नेली. काही वेळानंतर तरूण गाडीत बसल्यानंतर त्याला रोकड दिसून आली नाही. चोरीच्या घटनेनंतर तरूणाने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×