Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी चंद्रकांतदादा पाटलांचे पाऊल

स्वतःचे ‘SIR मॅपिंग’ पूर्ण करत नागरिकांना केले आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज स्वतःचे SIR (Special Intensive Revision) मॅपिंग आज कोथरुड मध्ये पूर्ण केले. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या प्रक्रियेत स्वतः सहभाग नोंदवून, त्यांनी पुणेकर आणि राज्यातील नागरिकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा – सविस्तर बातमी

मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून, हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केले. यामुळे त्यांची मतदार यादीतील माहिती आता पूर्णपणे सुरक्षित आणि अद्ययावत झाली आहे.

“लोकशाहीत मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव अचूक असणे आवश्यक आहे. मी माझे SIR मॅपिंग पूर्ण केले आहे, आता आपली बारी आहे. दुबार नावे टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी तातडीने आपले मॅपिंग पूर्ण करावे.” असे आवाहन ना. पाटील यांनी सर्व मतदार बांधवांना केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×