Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

नवरात्र उत्सव २०२५ निमित्त वाहतुकीत बदल

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी बदल

marathinews24.com

पुणे – मौजे वेहेरगाव, कार्ला (ता. मावळ) येथील श्री. एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ (दि. २२ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५) दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९/०५/१९९० चे अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

जेधे चौकातील भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद – सविस्तर बातमी

दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कार्ला फाटा ते श्री. एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

दि. २७ सप्टेंबर २०२५ ते दि. ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०६.०० ते रात्री २२.०० या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

जुना मुंबई–पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड व अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील.

पुणे–मुंबईकडे जाणारी जड व अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

कोंढवा येथे हाफ मॅरेथॉन निमित्त वाहतुकीत बदल

पुणे – कोंढवा येथे दि. २१ सप्टेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९ मे १९९० चे अधिसूचना यान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

दि. २१सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत एन.एच.-६५ व एन.एच.-९६५ दिवेघाट मार्गे सासवड येथे जाणारी वाहतूक बंद राहील व ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.

जड व अवजड वाहने सासवड – दिवेघाट – मंतरवाडी चौक मार्गे वळविण्यात येतील. हलकी वाहने (चार चाकी) सासवड – चांबळी – गराडे मार्गे मरीआई घाट – खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येतील.

वाहतुकीसाठी सासवड – कोंढवा – पुणे, सासवड – दिवेघाट – मंतरवाडी, सासवड – चांबळी – गराडे – मरीआई घाट – खेड शिवापूर – कात्रज घाट (चार चाकी) पर्यायी मार्गचा अवलंब करावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×