Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

जेधे चौकातील भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद

पोलीस भरतीनिमित्त सहकारनगर भागात वाहतूक बदल

वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट येथील गजबलेल्या देशभक्त केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनचालकांनी भुयारी मार्गाचा वापर न करता जेधे चौकातून सरळ सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत भोवली – सविस्तर बातमी

शंकरशेठ रस्त्याने सारसबाग, तसेच सिंहगड रस्त्याकडे जाणारे वाहनचालक देशभक्त जेधे चौकातील भुयारी मार्गाचा वापर करतात. भुयारी मार्गातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात तेथे पाणी साचते. भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (२२ सप्टेंबर) दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे शंकरशेठ रस्त्याने सिंहगड रस्ता, तसेच सारसबागेकडून (अण्णाभाऊ साठे पुतळा चौक) टिळक रस्ता, बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी जेधे चौकातून सरळ साररबागेकडे जावे. वाहनचालकांनी भुयारी मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

स्वारगेट भागात एसटी स्थानक, मेट्रो स्थानक, तसेच पीएमपी स्थानक असल्याने जेधे चैाक अहाेरात्र गजबजलेला असतो. सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, तसेच बाजीराव रस्त्याकडे जाणारे वाहन चालक जेधे चौकाचा वापर करतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×