Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत भोवली

सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत भोवली

१३ जणांविरुद्ध गुन्हा, आयुष कोमकर खून प्रकरण

marathinews24.com

पुणे – घरगुती वादातून आयुष कोमकर खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी १३ जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यातील ९ गुंड तडीपार; पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांचा दणका – सविस्तर बातमी 

सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरुबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके, माेहन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी प्रियंका गोरे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आयुष कोमकर याची सोनाली आणि प्रियंका आंदेकर मामी आहे. कोमकर याचा विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत गोळ्या झाडून कौटुंबिक वाद, तसेच टोळीयुद्धातून खून करण्यात आला आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायद्यानव्ये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोमकर याच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडी परिसरात एकत्रित बैठक झाली. आरोपी एकमेकांना मोबाइल घरी ठेवून भेटत होते. या प्रकरणात सोनाली आणि प्रियंका यांची चौकशी करण्यात आली होती. तपासात सोनाली खून प्रकरणाचा कट रचण्यात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठी गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी बाराच्या सुमारास ताब्यात घेतले.

सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले. दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांंनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोनाली, प्रियंका आंदेकरसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×