Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत 'चरण सेवा' उपक्रम

वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेऊन या सेवाकार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी भगिनी-बंधू दीर्घ पायी प्रवास करून येथे पोहोचतात. त्यांचा शारीरिक शीण दूर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘चरण सेवा’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

वारकरी संप्रदायात प्रत्येकामध्ये माऊलीचे दर्शन घेतले जाते. एकमेकांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याची परंपरा ही समतेचा आणि भक्तीचा संदेश देणारी आहे. अशा वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असून, विठुरायाच्या भक्तांची सेवा हीच विठ्ठलभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात तरुण स्वयंसेवक मोठ्या समर्पित भावनेने वारकऱ्यांची सेवा करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. विशेषतः आमदार सुनील कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले.

ग्रामविकास विभागामार्फत आधुनिक पद्धतीच्या चरण सेवा यंत्रांचीदेखील उपलब्धता करून देण्यात आली असून त्याद्वारे वारकऱ्यांना अधिक चांगली सुविधा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांत आषाढी वारीच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, निर्मल वारी अभियान, प्रशस्त पालखी मार्ग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या दोन ते तीन वर्षांत पंढरपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून, भविष्यात पंढरपूरचा विकास काशी, अयोध्या आणि उज्जैनप्रमाणे आदर्श धार्मिक क्षेत्र म्हणून करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×