युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात घडली. युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १७ वर्षीय युवकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. युवतीच्या आईने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गॅस सिलिंडरचा स्फोटात कुटुंबातील चौघे जखमी – सविस्तर माहित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील फुरसुंगी भागात तरूणीच्या घराजवळ आरोपी राहायला आहे. त्याने तिच्याशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला विवाहाचे आमिष दाखविले. दरम्यान, तरूणी वेगळ्या जातीतील असल्याने तरूणाने तिला नकार देण्यास सुरूवात केली. घरचे लोक आपल्या विवाहाला कुटुंबीय मान्यता देणार नाहीत. तू दुसर्या जातीतील आहे, असे सांगितले. तेव्हापासून युवती नैराश्यात होती. २३ मे रोजी युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणाने मुलीची फसवणूक केली, तसेच त्याने तिला जातीवाच शिवीगाळ केल्याचे युवतीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले तपास करत आहेत.
प्रेमसंबंधात फसवणूक झाल्याने आत्महत्या
विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाानी हेमंत सिंग (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अमित परमार (वय २६, रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवानीचा भाऊ चंद्रशेखर सिंग (वय ३२, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.