Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल स्पष्ट

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांनी नोडल अधिकारी व झोनल (क्षेत्रीय) अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीत निवडणूक आयोगाने नव्याने अमलात आणलेल्या दोन प्रमुख बदलांवर विशेष भर देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ – सविस्तर बातमी

यंदाच्या निवडणुकीत पी आर ओ अँपचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षांकडून मतदानाची माहिती दूरध्वनीद्वारे विविध स्तरांमार्फत पोहोचविली जात होती. मात्र आता केंद्राध्यक्षांनी मतदानासंदर्भातील सर्व माहिती थेट या अँपद्वारे नोंदवायची आहे. त्यामुळे माहिती प्रसारित होण्याच्या प्रक्रियेत असलेले मधले टप्पे कमी होऊन थेट मतदान केंद्रावरून निवडणूक आयोगापर्यंत माहिती पोहोचणार आहे. तसेच मतदानाची एकूण संख्या व टक्केवारी यांसारखी महत्त्वाची माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही पाहण्यासाठी उपलब्ध होणार असल्याने पारदर्शकतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

यासोबतच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना साहित्य घेण्यासाठी ठराविक केंद्रावर उपस्थित राहावे लागत होते. मात्र नव्या पद्धतीनुसार क्षेत्रीय अधिकारी मतदानाच्या आदल्या दिवशीच संबंधित मतदान केंद्रांवर जाऊन आवश्यक साहित्य कर्मचाऱ्यांना वितरित करणार आहेत. तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेच अधिकारी संबंधित साहित्य परत गोळा करून आणणार असल्याने कर्मचाऱ्यांचा ताण कमी होऊन वेळेचीही बचत होणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी एस..चोकलिंगम यांनी या दोन्ही बदलांचे महत्त्व अधोरेखित करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दिले. या बैठकीस निवडणूक निरीक्षक विद्यानंद सिंग, निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे व किशोर माने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्यासह सर्व नोडल व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×