Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली माहिती

marathinews24.com

पुणे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद – सविस्तर बातमी

यामध्ये महसूल विभागाच्यावतीने २ हजार १५०, पंचायत समितीअंतर्गत ६३७, पशुसंवर्धन विभाग ४०, आरोग्य विभाग १३४, कृषी विभाग ३८२, महावितरण १८२, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ३, भूमी अभिलेख २ आणि पुरवठा विभागाअंतर्गत ३६० याप्रमाणे एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करून, ७/१२ उतारे, फेरफार, ७/१२ दुरुस्ती, विविध दाखले तसेच विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कोलते-पाटील यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×