Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि
टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

marathinews24.com

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे तसेच, प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असून, अंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.

लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक

या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलांचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे.

कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान , परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक आहे. शासन आणि समाज दोघांनी मिळून हे काम करणे गरजेचे आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांनी बालक कर्करोग रुग्णांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्चाची मागणी केली होती. यासाठी विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये बीपीसीएल फाऊंडेशने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार बीपीसीएल फाऊंडेशन टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या बालक रुग्णांच्या सहाय्यासाठी योगदान देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत बीपीसीएल फाऊंडेशन यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून विशेष निधी सामाजिक दायित्वमध्ये देणार आहे. अशा या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होतात. गुणवत्तापूर्ण उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुले हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने प्रेरित होउन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी महत्वाचे योगदान दिले असून मुख्यतः गरीब व गरजू नागरिकांना, विशेषतः रुग्णांना, तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे आणि संपूर्ण प्रणाली कार्यक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कक्षामार्फत देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×