सीआयडीकडून व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाची चौकशी

सीआयडीकडून व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाची चौकशी

उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघातात प्रकरण

marathinews24.com

पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात आकस्मिक मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी (दि.५) चौकशी केली. संशयास्पद बाबी आणि व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आकस्मिक मृत्यूविषयी अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात असा संशय आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला होता.

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत – सविस्तर बातमी 

डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) व त्‍याबरोबरच एएआयबी (एअरक्राफ्ट ॲक्‍सीडन्ट इन्व्‍हीस्‍टीगेशन ब्युरो) यांच्‍या तपासाच्‍या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. व्ही. के. सिंग हे गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्‍यांचा मुलगा रोहीत सिंग याच्‍यासह सीआयडीच्या पाषाण रोड येथील कार्यालयात दाखल झाले. विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन तसेच अपघाताशी संबंधित इतर मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सातत्याने व्हीएसआर व्हेंचर्स आणि डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) यांच्यावर आरोप केले आहेत. कंपनीला कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती वाचवत असल्याचा दावा करत या प्रकरणातील खरा दोषी शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच कंपनीचे संचालक आणि व्ही. के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग हा विमानाच्या कॉकपिटमध्ये झोपल्याचा व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही अनियमितता असल्याची तक्रार तपास यंत्रणेकडे प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सीआयडीने चौकशी सुरू केली आहे.

कंपनीच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि काही करारपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान व्ही. के. सिंग यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती घेण्यात आली असून काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या शंकांबाबतही त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×