उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास सीआयडी करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास सीआयडी करणार

बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

marathinews24.com

पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (दि.२८) बारामती परिसरात विमान अपघातात मृ्त्यू झाला आहे. याप्रकरणाची आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास (सीआयडी) करण्यात येणार आहे. दरम्यान, विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दादा, ताकदीचा नेता नियतीने हिराहून घेतला ! – सविस्तर बातमी 

मुंबईहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (दि. २८) बारामतीकडे विमानातून प्रवास करत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत जात होते. दिवसभर त्यांच्या बारामती परिसरात चार सभा होणार होत्या. त्यामुळे ते सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना पावणे नऊच्या सुमारास विमानाला अपघात झाला. अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यृ झाला. पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पाेलीस ठाण्यात केली आहे. संबंधित दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येणार आहे’, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. विमान अपघाताची चौकशी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×