Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

तक्रारदाराकडून दीड हजारांची लाच घेणाऱ्याला लिपिकाला पकडले

तक्रारदाराकडून दीड हजारांची लाच घेणाऱ्याला लिपिकाला पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – कागदपत्रांची फाईल गहाळ झाल्याचे तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा ग्राहक तक्रार निवार आयोगातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील एका उपाहारगृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लिपिकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी – सविस्तर बातमी 

योगेश दत्तात्रय चवंडके (वय ३७) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराचा २०२२ मध्ये अपघात झाला होता. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तक्रारदाराने नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली होती. विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने दावा दाखल केला होता. दाव्यावरील सुनावणीस गेल्या तारखेला तक्रारदार ग्राहक आयोगात उपस्थित राहिले. तेव्हा दाखल केलेल्या दाव्याची फाईल गहाळ झाल्याचे लिपिक चवंडके याने त्यांना सांगितले होते.

संबधित फाईल शोधून पटलावर ठेवण्यासाठी चवंडकेेने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने दीड हजारांची लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी (१ जुलै) चवंडकेने तक्रारदारांशी संपर्क साधला. गहाळ झालेली फाईल मिळाली असल्याचे सांगितले. मंगळवारी दुपारी नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील उपाहारगृहाजवळ तक्रारदाराला बोलाविले.

त्याच्याकडून दीड हजारांची लाच घेणाऱ्या चवंडके याला सापळा लावून पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा चवंडकेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.

खरेदीखताची प्रत देण्यासाठी ५ हजारांची लाच

खरेदीखताची प्रत देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या दुय्यम निबंधक हवेली कार्यालयाच्या आवारात एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील तहसीलदार कचेरीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अनिता विनोद रणपिसे (वय ५४, रा. जेजुरी जकातनाका, सासवड) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. रणपिसे हे तहसीलदार कचेरीच्या आवरात टंकलेखनाचे काम करते. तक्रारदाराला घर तारण ठेवून कर्ज काढणार होते. त्यासाठी खरेदीखताची प्रत मिळवण्यासाठी ते तहसीलदार कार्यालयात आले होते.

आवारात टंकलेखनाचे काम करणारी रणपिसे ही प्रत मिळवून देण्यासाठी सहा हजारांची लाच मागितली. तडजोडीत पाच हजारांची लाच देण्याचे मान्य करुन तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर मंगळवारी तक्रारदाराकडून लाच घेताना रणपिसेला पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top