Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विद्या प्रतिष्ठानच्या स्कुलला क्लार्कने घातला ३७ लाखांचा गंडा

बनावट रेकॉर्ड तयार करुन इंटरनेट बँकिंगद्वारे पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले पैसे

marathinews24.com

पुणे – विद्या प्रतिष्ठान नामवंत संस्थेतील नांदेड सिटी पब्लिक स्कुलमध्ये काम करणाऱ्या क्लार्कने इंटरनेट बँकिंगद्वारे संस्थेतील ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपये पत्नीच्या नावावर ट्रान्सफर करुन पवार पब्लिक स्कुलला गंडा घातला आहे. याबाबत प्राचार्या वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. चंद्रागण सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजेंद्र अनपट आणि अश्विनी अनपट ऊर्फ अश्विनी तरटे (रा. युतिका एन्क्लेव्ह, कोल्हेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नांदेड सिटी येथील पवार पब्लिक स्कुल येथे ५ नोव्हेंबर २०२४ ते ३ जून २०२५ दरम्यान घडला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षपदी असून खजिनदार युगेंद्र श्रीनिवास पवार आहेत. खासदार सुप्रिया सदानंद सुळे या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.

लाच घेताना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव जाळ्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या प्रतिष्ठान संस्थेत राजेंद्र अनपट हा क्लार्क म्हणून कामाला आहे. त्याने संस्थेच्या संमतीशिवाय इंटरनेट बँकिंगद्वारे परस्पर रक्कम पत्नी अश्विनीच्या नावे ट्रान्सफर केली. संस्थेच्या अभिलेखात खोटे रेकॉर्ड तयार करुन संस्थेचा विश्वासघात केला. ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. संस्थेच्या लेखा परिक्षणात ही बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. राजेंद्र अनपट याला चौकशीसाठी बोलवले आहे, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोसे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×