पुण्यात हवालदाराने घेतली दीड लाखांची लाच

पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाच प्रकरणात पकडले

तक्रारदाराच्या छातीचा चावाही काढला

marathinews24.com

पुणे – हैद्राबादमधील न्यायालयाच्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने तक्रारदाराकडून दीड लाखांची लाच घेतली आहे. त्याला रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले असून, कारवाईवेळी त्याने तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतला. याप्रकरणी गणेश शहाजी कसपटे (वय ४० रा. शंकर सुमन हाईटस, भेकराईनगर, फुरसुंगी ) असे कारवाई केलेल्या हवालदाराचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात तीन महिन्यात बाल लैंगिक अत्याचारांचे ५० गुन्हे – सविस्तर बातमी

तक्रारदार काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकाने धनादेश बाउंस केला होता. त्यामुळे मालकाविरूद्ध हैद्राबादमधील न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. त्याची बजावणी न करण्यासाठी आण् िअटन न होउ देण्यासाठी कोरेगाव पार्क ठाण्यातील हवालदार गणेश कसपटे याने तक्रारदाराकडे ७ मार्च २०२६ रोजी ५ लाखांची लाच मागितली होती. १ मे रोजी त्याने पुन्हा अडीच लाखांची मागणी केली. तडजोडीअंती दोन लाख रूपये घेण्याचे मान्य केले. ६ मे रोजी एसीबीने सापळा रचून कसपटे याला दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यावेळी त्याने तक्रारदाराच्या छातीचा चावा काढला. याप्रकरणी आरोपी कसपटेविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×