Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान

उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित उद्यान महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या या संकल्पनेला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती – सविस्तर बातमी 

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या फुले, फळे आणि भाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सभागृह नेते गणेश बीडकर, मनपा आयुक्त नवल किशोर राम , अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,  अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज , बनकर, उद्यान विभागाचे घोरपडे  आदि मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण देशाचा कारभार सुरळीतपणे चालविणाऱ्या संविधानाची सर्व नागरिकांना, विशेषतः देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थी वर्गाला ओळख व्हावी, संविधानाची मूल्य, संविधानाला नागरिकांकडून असलेल्या अपेक्षा, कर्तव्य आणि अधिकार याची माहिती व्हावी, या दृष्टीने या उद्यानाची उभारणी केली जाणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक या प्रस्तावाला मान्यता देतील व या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही देखील वाडेकर यांनी दिली.

याच कार्यक्रमात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी  संविधान उद्यान उभारण्यासाठी दोन दिवसात उद्यान विभागाचे प्रमुख घोरपडे यांच्यासह पाहणी करून जागा निश्चित करण्यात येईल, अशी घोषणा देखील केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×