Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती

उपमहापौर परशुराम वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

marathinews24.com

पुणे – शहरात घनकचरा विभागाचा आंधळा कारभार सुरू असून स्वच्छतागृह आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी झाडू हाती घेऊ, अशी तंबी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांना दिली.

‘हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी – सविस्तर बातमी 

आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चौथ्याच दिवशी वाडेकर यांनी सकाळी सहा वाजताच सपकाळ आणि क्षेत्रीय आयुक्त नायकर, मुख्य आरोग्य निरीक्षक इनामदार, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, आरोग्य निरीक्षक प्रवीण दरेकर, मुकादम संतोष शेलार, सिद्धार्थ बागुल या अधिकाऱ्यांसह दोन – तीन आरोग्य कोठ्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता खुद्द आरोग्य निरीक्षक अनुपस्थित असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे 54 सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ 23 कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. मागील हजेरीची पाहणी केली असता कागदावर 100 टक्के उपस्थिती लावल्याचे दिसून आले. घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे एकमेकात संगनमत होत असून त्यांच्याकडून एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम केले जात असल्याचे दिसून आले आहे, त्यातील जे उशिरा आले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली उर्वरित लोकांवरही कारवाई होणार असल्याचे वाडेकर यांनी नमूद केले.

आरोग्य हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विशेषतः झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना नरकसदृश परिस्थितीत राहावे लागत आहे. सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. कचरा पेटीतील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबंधी घनकचरा विभागातील प्रमुख सपकाळ हे स्वतः उपस्थित असल्यामुळे वस्तुस्थिती त्यांच्या नजरेसमोर आली आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. घनकचरा विभागाच्या कारभारात त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश यांना देण्यात आले आहेत, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×