Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

भाविकांना नित्यदर्शनाकरिता मंदिर ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय; भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

marathinews24.com

पुणे – नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेवून मंदिर व परिसराचे कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल २०२६ रोजीपासून पुढे ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

देशी गो संवर्धन लेख मालिका भाग-३ – सविस्तर बातमी  

सन २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्याप्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता विचारात घेण्यासोबतच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सुरु आहे.

कुंभमेळ्यावेळी श्री. क्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जुन्या सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून पायरी मार्गाचे काम देखील सुरू सुरु आहे. सद्यस्थितीत मुख्य सभामंडप पूर्ण उतरवून नवीन सभामंडप बांधकाम प्रगतीपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामुग्री मंदिर परिसरात असल्याने, चालू कामांचे स्वरुप, भौगोलिक परिस्थिती व भाविकांची संख्या विचारात घेता बांधकाम सुरु असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. मंदिर सभामंडपाचे साधारणतः ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणा-या प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग पुर्णतः बंद आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. माहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यामुळे सद्यस्थितीत विकास कामांना गती देण्यात आलेली आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×