वाहतूक पर्यायी मार्गाने
marathinews24.com
पुणे – येरवड्यातील तारकेश्वर पुलाचे (येरवड्याकडून कोरेगाव पार्ककडे जाणारा रस्ता) दुरस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारपर्यंत या भागातून जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी
तारकेश्वर पुलाकडून कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या पुलाचा काही भाग (एक्सपान्शन जाॅईंट) खराब झाला आहे. पुणे महापालिकेकडून तेथे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, तेथे काँक्रीट भरण्यात येणार आहे. काँक्रीटचे काम पूर्ण होईपर्यंत किमान तीन दिवस लागणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत (११ मे) या भागातून जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाने जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.