Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बांधकाम व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फस‌वणूक

बांधकाम व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फस‌वणूक

व्यवसायासाठी ८१ कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिष

marathinews24.com

पुणे – व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची एक कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक सेनापती बापट रस्ता भागात राहायला आहेत. त्यांची आराेपींशी गेल्या वर्षी ओळख झाली होती. बांधकाम व्यवसायासाठी माफक दरात खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी बांधकाम व्यावसाियकाला दाखविले होते. त्यानंतर कर्ज मंजुरी प्रक्रिया, तसेच कागदपत्रांची पूर्ततेच्या नावाखाली आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी एक कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये घेतले. कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×