Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम; इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा 

marathinews24.com

पुणे – समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते.

ज्येष्ठांसाठी आधारवड ठरत आहे “एल्डर लाईन” राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ – सविस्तर बातमी 

मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे, तसेच चालकांना मार्गदर्शन करणे या उपाययोजना करण्यात येत आहेत. या माध्यमातून कंपनीने राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात मोलाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी मर्सिडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई-वाहन धोरणाबाबत चर्चा केली. भविष्यात कंपनीने ई-वाहन क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×