Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

भरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलत

भरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलत

विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ञांना सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्यातील भरती परीक्षा पद्धतीच्या विविध बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ तसेच संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, मते व अनुभव जाणून घेण्यात येणार आहेत.

दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – सविस्तर बातमी 

या अनुषंगाने समितीची पुणे विभागीय सल्लामसलत १२ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सल्लामसलत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. या चर्चेत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकती

भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबतचे अनुभव, अपेक्षा आणि सुधारणा सूचना जाणून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुणे महसूल विभागातील सल्लामसलत प्रक्रियेच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे स्वतंत्र समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्यार्थी, उमेदवार, संस्था, तज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर पर्यंत Pune-ExamReformsTaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येतील.

प्राप्त सूचना व प्रत्यक्ष संवादासाठी आलेल्या विनंत्यांचा आढावा घेऊन सल्लामसलतीच्या नियोजनानुसार संबंधित व्यक्ती व संस्थांना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी चर्चेची वेळ कळविण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण, परीक्षा अनुभव तसेच भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित इतर बाबींवरही सूचना व चर्चा करता येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×