Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

समुपदेशनातून आरोग्य सहाय्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर

समुपदेशनातून आरोग्य सहाय्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर

पुणे जिल्हा परिषदेत पारदर्शक पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण; कर्मचारी व संघटना प्रतिनिधींच्या सहकार्याला यश

marathinews24.com

पुणे – कर्मचारी सेवेला न्याय आणि प्रशासनात पारदर्शकता या भूमिकेतून पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहाय्यिका यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक वातावरणात पूर्ण करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात झालेल्या या प्रक्रियेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – सविस्तर बातमी 

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल कृष्णराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली दीपक हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्या सुनियोजनातून प्रक्रिया नियोजनबद्ध व सुसूत्र पद्धतीने पार पडली.

पदोन्नती प्रक्रियेदरम्यान उपलब्ध पदे, सेवाज्येष्ठता तसेच पदोन्नतीनंतरचे सेवा स्थळ याबाबत कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देण्यात आली. समुपदेशनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या शंका व अडचणींचे निरसन करण्यात आल्याने प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रक्रियेत विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. प्रशासन, संघटना प्रतिनिधी आणि कर्मचारी यांच्या समन्वयातून प्रक्रिया राबविण्यात आल्याने कोणताही तणाव निर्माण न होता पदोन्नतीची प्रक्रिया आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण झाली.

पदोन्नतीमुळे आरोग्य यंत्रणेला मिळणार नवे बळ

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा अधिक प्रभावीपणे उपयोग होणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहाय्यिका यांच्या पदोन्नतीमुळे त्यांच्या सेवेला नवी दिशा मिळण्यासोबतच सक्षम कर्मचारी आणि सक्षम आरोग्य व्यवस्था या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींना प्रशासनाकडून प्राधान्य दिल्याने आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.

समुपदेशन, संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून पूर्ण झालेली ही पदोन्नती प्रक्रिया प्रशासन व कर्मचारी यांच्यातील सकारात्मक संबंधांचे उदाहरण ठरली आहे. संघटना प्रतिनिधींनीही प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×