Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल

मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल

ज्येष्ठाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ७० वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहा वर्षांची असून, ती मतिमंद आहे. आरोपी ज्येष्ठाला मुलीचे कुटुंबीय ओळखतात. तो घराशेजारी तो राहायला आहे. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मतिमंद मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने मुलीला आमिष दाखवून घराशेजारी असलेल्या अडगळीच्या जागेत नेले. तेथे त्याने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलगी घाबरली. तिने या घटनेची महिती कुटुंबीयांना दिली.

त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मदने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×