जेजुरी पोलीस ठाण्यातील हवालदारसह दोघांविरुद्ध गु्न्हा

वाॅरंट रद्द करण्यासाठी मागितली लाच

marathinews24.com

पुणे – वाॅरंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारसह दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हवालदारसह दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७, रा. साळुंखे इमात, मोरगाव रस्ता, जेजूरी, ता. पुरंदर ), सचिन अरविंद चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभगाकडे तक्रार दिली.

गुंड बंडू आंदेकरच्या वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

तक्रारदार कापड व्यावसायिक आहेत. २०१९ मध्ये तक्रारदाराच्या मुलाने एकाविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांची पत्नी साक्षीदार होते. ५ डिसेंबर रोजी हवालदार बनसोडे आणि त्यांचा ओळखीतील चव्हाण हे तक्रारदाराच्या घरी आले. ‘तक्रारदार आणि त्यांच्य पत्नीविरुद्ध जेजुरी पोलिसांनी वाॅरंट बजावले. दोघांना पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे’, असे हवालदार बनसाेडे यांनी त्यांना सांगितले. ‘हे वाॅरंट जामीनपात्र असून, रद्द करण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील’, असे सांगून हवालदार बनसोडे यांनी तक्रारदाराकडे वाॅरंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रारदाराने तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी करण्यात आली. चौकशीत हवालदार चव्हण यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×